अमरनाथ यात्रा येत्या ३० जूनला कोविड प्रतिबंधक नियमांसह सुरु होणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरनाथ यात्रा येत्या ३० जूनला कोविड प्रतिबंधक नियमांसह सुरु होणार आहे. अमरनाथ श्राइन बोर्डाचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे नायक राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली. या यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी ११ एप्रिलपासून सुरु होईल. ही यात्रा ४३ दिवस चालणार असून ११ ऑगस्टला समारोप होईल, असं त्यांनी सांगितलं. काल जम्मूमध्ये राजभवनात झालेल्या अमरनाथ श्राइन बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
पहलगाव मार्ग आणि बालताल मार्गावरुन एकाच वेळी सुरु करण्याचा निर्णय बोर्डानं घेतला असल्याचं बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीश्वर कुमार यांनी सांगितलं. प्रत्येक मार्गावरुन, हेलीकॉप्टरनं प्रवास करणारे प्रवासी सोडून, दररोज फक्त १० हजार यात्रेकरुना जाण्याची परवानगी असेल. यात्रेकरुंच्या येण्याजाण्यावर लक्ष ठेवण्य़ासाठी सरकार आरएफआयडी प्रणाली सुरु करेल, असं त्यांनी सांगितलं.