Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जळगाव जिल्ह्यात बनवलेल्या रॉकेटची पोखरण इथं चाचणी यशस्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ इथंल्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यानं बनवलेल्या पिनाका रॉकेट लाँचर पॉड MK -1 ची पोखरण इथं यशस्वी चाचणी करण्यात आली. या कारखान्यात पिनाका रॉकेट लाँचर पॉड  बनवण्याचं  काम 2014 पासून यशस्वीपणे सुरु आहे. त्याव्यतिरिक्त या कारखान्यात उन्नत पिनाका रॉकेट पॉड विकसित करण्याचं कामही सुरू आहे. या उन्नत पिनाका रॉकेटची 45 किलो मीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता असून, पिनाका रॉकेट MK-1 ची क्षमता 38 किमी पर्यंत आहे.

आज करण्यात आलेली चाचणी हे भुसावळच्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्याचं मोठं यश मानलं जात आहे. या यशस्वी चाचणीबद्दल या कारखान्याचे महाव्यवस्थापक.वसंत निमजे यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. या कारखान्याचं गेल्या ६ महिन्यातलं हे दुसरं मोठं यश असून, डिसेंबर  2021 मध्ये पोखरणमध्ये DPICM पॉडची यशस्वी चाचणी करण्यात आली होती.

Exit mobile version