मार्च महिन्यात १ लाख ४२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वस्तू आणि सेवाकर संकलन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मार्च महिन्यात आतापर्यंतचं सर्वात जास्त, म्हणजे १ लाख ४२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वस्तू आणि सेवाकर संकलन झालं आहे. यात केंद्रीय वस्तू आणि सेवाकराचा वाटा २५ हजार ८३० कोटी रुपये, तर राज्य वस्तू आणि सेवाकराचा वाटा ३२ हजार ३७८ कोटी रुपयांचा आहे. एकात्मिक वस्तू आणि सेवाकराचं संकलन ७४ हजार ४७० कोटी रुपये, तर आधिभार ९ हजार ४१७ कोटी रुपये जमा झाले आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात १ लाख ४० हजार ९८६ कोटी रुपये करसंकलन झालं होतं. हा विक्रम मार्चमधे मोडला असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं सांगितलं. गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या करसंकलनापेक्षा यावेळी मार्चमधलं करसंकलन १५ टक्के जास्त आहे.