अहमदनगरमधील रंधा धबधबा इथं लवकरच काचेचा पूल तयार करण्यात येणार
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात पर्यटनविकास प्रकल्पांतर्गत रंधा धबधबा इथं लवकरच काचेचा पूल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी मंजुरी मिळालेल्या ५ कोटींपैकी अडीचकोटी रुपयांचा निधी नुकताच प्राप्त झाल्याची माहिती आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली.
निसर्गपर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारदरा इथल्या रंधा धबधब्यावर होणारा हा पूल महाराष्टातला पहिला काचेचा पूल असून देशातला सहावा पूल आहे. लवकरच या भागातल्या पर्यटन विकासासाठी विविध प्रकल्प राबवले जाणार असून त्यामध्ये कळसुबाई येथे रोप वे चा समावेश आहे.