Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातल्या नद्यांच्या संवर्धनासाठी प्रदूषण कमी करणारे प्रकल्प मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत राज्यातल्या कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी आणि मुळा मुठा या नद्यांच्या संवर्धनासाठी, एकूण 1 हजार 182 कोटी 86 लाख रुपये खर्चाचे प्रदूषण कमी करणारे प्रकल्प मंजूर केले आहेत. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी केंद्राचा हिस्सा म्हणून 208 कोटी 95 लाख रुपये वितरित केले असल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

कराड, सांगली, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि प्रकाशा या शहरांमध्ये आतापर्यंत प्रतिदिन 260 दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया क्षमता निर्माण केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

Exit mobile version