Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुणे जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्जाचं वाटप

पुणे : नुकत्याच संपलेल्या 2021-22 या आर्थिक वर्षात पुणे जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे 3892 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आलं आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या विक्रमी कामगिरीची नोंद झाली आहे. जिल्ह्याचं पीक कर्ज वाटपाचं 3882 कोटी रुपयांचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जातीनं लक्ष घालून सर्व प्रमुख बँकांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळेच पुणे जिल्ह्याने गेल्या आर्थिक वर्षात उद्दिष्ठापेक्षा 10 कोटींनी जास्त म्हणजे तब्बल 3892 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाची ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

यापूर्वी 2015-16 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकंदर 3506 कोटी रुपये पीक कर्जाचं वाटप झालं होतं मात्र यावेळी हा उच्चांक मोडीत काढून त्यापेक्षा 386 कोटी रुपये अधिक पीक कर्ज वाटपाचा नवा इतिहास नोंदवला गेला आहे. जिल्ह्यातील एकंदर 3 लाख 77 हजार 410 शेतकऱ्यांना या पीक कर्जाचा लाभ झाला आहे. दरवर्षी पीक कर्ज वाटपात मागे राहणाऱ्या जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी यावेळी 100 टक्क्यांपेक्षा जास्त तर खाजगी क्षेत्रातील बँकांनीही 99 टक्क्यांहून अधिक पीक कर्जाचं  वाटप केल्याची आकडेवारीही समोर आली आहे.

Exit mobile version