चिंचवड : दक्षिण कोरियन वाहन निर्माता कंपनी किआ मोटर्सने चिंचवडच्या अमन कीया मोटर्समध्ये सेल्टोस कार उपलब्ध करुन दिली आहे. पिंपरी उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिंचवडमध्ये अमन कीया मोटर्सचे उद्घाटन पुणे व पिंपरी-चिंचवडमधील शेकडो मान्यवर व कंपनीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
किया सेल्टोस कारच्या विक्रीचे उद्घाटन करताना अमन किआ मोटर्सचे संचालक अमन देवीचंद अग्रवाल व आदित्य अग्रवाल म्हणाले की, पिंपरी, चिंचवड, देहूरोड, मावळ मध्ये गाड्यांची वैशिष्ट्ये आणि कमी किंमतीमुळे सेल्टस कारला खूप पसंती मिळाली आहे. पाहताच क्षणी कार बुक करण्याची इच्छा निर्माण होते. सेल्टोस कार विविध आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
अमन किया मोटर्स शोरुमच्या शुभारंभ प्रसंगी अग्रवाल फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पुणे शहर अग्रवाल समाजचे अध्यक्ष ईश्वचंद अग्रवाल, मित्तल ग्रुपचे सर्वेसर्वा नरेश मित्तल, गोयल गंगाचे चेअरमन जयप्रकाश गोयल, स्कसेस ग्रुपचे देवीचंद अग्रवाल, आज का आनंद चे मुख्य संपादक शाम अग्रवाल, बव्हेरिया मोटर्सचे घनशाम अग्रवाल, वंदा गु्रपचे रमेश गोयल, पिंपरी चिंचवड अग्रवाल समाजचे अध्यक्ष भीमसेन अग्रवाल, मोहन गुप्ता, प्रेमचंद मित्तल, डी.व्ही मोडक, माधव किलोस्कर, शकुर चौधरी, रामकुमार गोयल आदी उपस्थित होते.
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात दक्षिण कोरियाची प्रख्यात वाहन निर्माता किआ मोटर्स द्वारा सेल्टोस कारची निर्मिती केली जात आहे. कंपनी या प्लांटमध्ये अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करते. कंपनी प्लांटमध्ये 300 हून अधिक रोबोट वापरते. भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन सेल्टोस तयार करण्यात आली आहेत.
किआ मोटर्सने हिंदुस्थानमध्ये दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्यात 1 वर्षाकाठी तीन लाख युनिट उत्पादन करण्याची क्षमता असणर्या या प्लांटवर 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. या वैशिष्ट्यांसह सुसज्ज, किया सेल्टोस किया मोटर्सच्या या एसयूव्ही सेल्टोस कारमध्ये तीन इंजिन पर्याय आहेत. 1. 4-लिटर टर्बोचार्ड पेट्रोल, 1. 5 – लिटर पेट्रोल आणि 1. 5 लिटर डिझेल इंजिन आहे. सर्व इंजिन बीएस 4 एमिशन नॉर्स अनुरूप आहेत.