Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील

मुंबई (वृत्तसंस्था) : पाळीव प्राण्यांच्या आजारांचं वेळेत निदान करण्याच्यादृष्टीनं पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयाच्या आवारातल्या अतिविशेषता पशुवैद्यकीय दवाखानाच्या नव्या इमारतीचं आज पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झालं, त्यावेळी ते बोलत होते. अशाप्रकारचा हा राज्यातला एकमेव पशुवैद्यकीय दवाखाना आहे, याचा पशुपालक शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल असं पवार म्हणाले. राज्य सरकार देशी गायी आणि म्हशींसाठीची प्रयोगशाळा उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पशुसंवर्धन आणि संबंधित व्यवसायांशी निगडीत उपक्रमांना राज्य शासनाकडून दिल्या जात असलेल्या आर्थिक सहकार्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Exit mobile version