Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नावनोंदणी सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी आजपासून सुरु झाली. येत्या ३० जून ते ११ ऑगस्ट या काळात यंदाची अमरनाथ यात्रा सुरु राहणार असून जम्मू-काश्मीर बँक,  पंजाब नॅशनल बँक आणि येस बँकेच्या ४४६ शाखा आणि  भारतीय स्टेट बँकेच्या देशभरातल्या एकूण शंभर शाखांमध्ये यात्रेची नोंदणी करता येईल, तसंच श्राईन बोर्डची वेबसाईट आणि  मोबाईल ऍपच्या माध्यमातून देखील अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करता येईल अशी माहिती श्री अमरनाथजी श्राईन बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीश्वर कुमार यांनी दिली. यंदा पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर एकाच वेळी  अमरनाथ यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक मार्गावर दर दिवशी १० हजार यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल. तसंच  यात हेलिकॉप्टरने जाणाऱ्या यात्रेकरूंचा समावेश नसेल असं ते म्हणाले. यंदा ३ लाखापेक्षा जास्त भाविक अमरनाथ  यात्रेला हजेरी लावतील असा अंदाज असून अमरनाथ यात्रेकरूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सरकार आर.एफ.आई.डी. प्रणाली लागू करणार असल्याची माहिती नीतीश्वर कुमार यांनी दिली. दरम्यान, सूचना आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज श्री अमरनाथ यात्रेची माहिती प्रसारमाध्यमांना देण्याबाबत चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित केली असून जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव अरूण कुमार मेहता, अमरनाथ जी श्राईन बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीश्वर कुमार, जम्मू-कश्मीरचे  प्रधान सचिव रोहित कंसल आणि केंद्रसरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील.

Exit mobile version