Site icon साप्ताहिक एकच ध्येय

किरकोळ चलनफुगवट्याचा दर मार्च महिन्यात ६ पूर्णांक ९५ शतांश टक्क्यांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : किरकोळ चलनवाढीचा दर मागील महिन्यातील ६ पूर्णांक ७ टक्क्यांवरून यावर्षी मार्चमध्ये ६ पूर्णांक ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ प्रामुख्याने अन्न आणि तेलाच्या वाढत्या किमतींमुळे वाढली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने काल जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये अन्न क्षेत्रामधील हा दर ७ पूर्णांक ६८ टक्के होता, तर फेब्रुवारीमध्ये ५ पूर्णांक ८५ टक्के होता. या वर्षी मार्चमध्ये किरकोळ चलनवाढीने सलग तिसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्धारित ६ टक्क्यांची उच्च मर्यादा ओलांडली आहे. जानेवारी २०२२ मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ६ पूर्णांक १ शतांश टक्के होता. किमान दोन टक्क्यांच्या फरकाने किरकोळ चलनवाढ चार टक्के राखणे सरकारने आरबीआयला बंधनकारक केले आहे.

Exit mobile version