Site icon साप्ताहिक एकच ध्येय

घर विक्रीसाठी सोसायटीच्या परवानगीची गरज नसल्याची गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : एखाद्या घरमालकाला घर विकायचा असेल किंवा घर भाड्यावर द्यायचं असेल, तर तो रहात असलेल्या सोसायटीची परवानगीची आवश्यकता नाही, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. घर मालकाला स्वतःच्या घराचा हक्क आहे. त्याला ते घर कोणाला विकावं हा त्याचा निर्णय आहे. घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही, असंही आव्हाड म्हणाले. काही ठिकाणी जातीनिहाय घरे विकली जातात. विशिष्ठ जाती समुदाय किंवा शाकाहारी लोकं शाकाहारींनाच विकतात. त्यामुळे महाराष्ट्र हा वेगवेगळ्या विभागांत विभागला जात आहे. मुंबई ही एकत्र राहायला हवी, यासाठी हा प्रयत्न आहे, असंही आव्हाड यांनी सांगितलं. तसंच, ‘एखाद्या घरमालकानं त्याची थकबाकी बाकी नाही, हे एनओसी पत्र काढून घ्या, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस तपास करतात, असंही त्यांनी स्पष्ट कलं.

Exit mobile version