Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात १ लाख ३५ हजार ‘व्हीव्हीपॅट’ यंत्र उपलब्ध

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 96 हजार 661 मतदान केंद्रांसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट)  आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट  (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्र देण्यात आले आहेत. त्यामध्ये राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेची लगबग सुरु आहे. मतदानासाठी बॅलेट युनिट (बीयू) आणि कंट्रोल युनिट (सीयू) महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याच्या जोडीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वप्रथम व्हीव्हीपॅट वापरण्यात आले होते.

या सर्व यंत्रांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यंत्रांची पुरेशी उपलब्धता असून राखीव यंत्रांचा देखील त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

Exit mobile version