महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२२ साठीच्या परीक्षा १९ मे पासून सुरु होणार
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२२ साठीच्या परीक्षा १९ मे पासून सुरु होणार आहेत. या परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जाणार असून पहिला टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाचा आहे. परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
या परीक्षेसाठी एकूण २ हजार २०० विद्यार्थी बसले असून दुसरा टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम वगळता उर्वरित सर्व पदव्युत्तर आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष, कृत्रिम अवयव विज्ञान, परिचर्या व सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या सर्व वर्षांच्या लेखी परीक्षा १ जुलैपासून सुरु होऊन ३१ ऑगस्ट रोजी संपणार आहेत. या परीक्षेसाठी एकूण ४५ हजार विद्यार्थी बसणार आहेत. दरम्यान, विद्यापीठाच्या २०२१ या हिवाळी सत्रातल्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांचे निकाल मे २०२२ अखेरीस जाहीर करण्याचे प्रस्तावित आहे.