युक्रेनमधला हिंसाचार आणि संघर्ष त्वरित थांबवण्याचं भारताकडून आवाहन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं मानवतावादी सहाय्यसंबंधीच्या संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व अधोरेखित करत युक्रेनमधला हिंसाचार आणि संघर्ष त्वरित थांबवण्याचं आवाहन केलं आहे. संयुक्त राष्ट्रातले भारताचे स्थायी प्रतिनिधी आर रवींद्र यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका स्पष्ट केली, त्यावेळी ते बोलत होते. मानवता, तटस्थता, निष्पक्षता आणि स्वातंत्र्य या गोष्टींचं कधीही राजकारण केलं जाऊ नये, असं भारताचं मत असून युक्रेनमधल्या बिघडलेल्या परिस्थितीबद्दल भारत चिंतित आहे, असं ते म्हणा