Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई शेअर बाजारात आज तेजी

मुंबई (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारातल्या मिश्र स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, औषध उद्योग, वाहन उद्योग, ऊर्जा, बांधकाम आणि भांडवली वस्तू क्षेत्राच्या समभागांसह बहुतेक सर्व क्षेत्राच्या समभागांनी आज नफा नोंदवला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ८७४ अंकांनी वधारला आणि ५७ हजार ९१२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५६ अंकांनी वधारला आणि १७ हजार ३९३ अंकांवर बंद झाला. चालू वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगानं विकसित होणारी मोठी अर्थव्यवस्था राहणार असून, हे  वृत्त केवळ भारतासाठीच नव्हे, तर  संपूर्ण जगासाठी सकारात्मक ठरेल असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटल्यामुळे आज गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं.

Exit mobile version