प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्यात द्वीपक्षीय चर्चा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. या द्द्विपक्षीय चर्चेत प्रधानमंत्री मोदी दोन्ही देशातील परस्पर सहकार्याच्या क्षेत्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.
जॉन्सन यांचा दोन दिवसीय भारत दौरा कालपासून सुरु झाला. आज सकाळी राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आलं. जॉन्सन यांनी राजघाटालाही भेट दिली आणि महात्मा गांधींच्या समाधीला पुष्पहार अर्पण केला.
ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. भारत आणि ब्रिटनमधील नातेसंबंध आणि मैत्री आजच्यासारखे चांगले किंवा मजबूत याआधी कधीच नव्हते असे बोरिस जॉन्सन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं.