सिरामीक्स आणि काचेच्या वस्तूंमधील भारताच्या निर्यातीचा गेल्या आर्थिक वर्षात उच्चांक
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या सिरॅमिक आणि काच वस्तू निर्मिती उद्योगाने २०२१ – २२ या वर्षात ३ हजार ४६४ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची विक्रमी निर्यात केली आहे. मेक इन इंडिया योजनेअंतर्गत देशातल्या टाईल्स निर्मिती उद्योगाने आंतराष्ट्रीय बाजारात महत्वाचं स्थान मिळवत परदेशी चलनात कमाई केली आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली.
पोर्सलीन, काच आणि सिरॅमिक पासून बनवलेल्या विविध वस्तूंच्या सागरी वाहतुकीत वाढ झाल्यामुळे हा बदल घडून आल्याचं त्यांनी सांगितलं. टाईल्स निर्मितीच्या जागतिक क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे असंही त्यांनी सांगीतलं. सौदी अरब, अमेरिका, मेक्सिको, कुवैत, पोलंड यांच्यासह १२५ होऊन अधिक देशांना भारत ही उत्पादनं निर्यात करतो असं ते म्हणाले.