Site icon साप्ताहिक एकच ध्येय

श्रीलंकेला जीवनाश्यक वस्तू आयात करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यास जागतिक बँकेची सहमती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेला जीवनाश्यक वस्तू आयात करण्यासाठी ६० कोटी अमेरिका डॉलर्सचं अर्थसहाय्य करायला जागतिक बँकेनं सहमती दर्शवली आहे. श्रीलंकेच्या अध्यक्ष्यांच्या प्रसार माध्यम विभागानं  काल एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

जागतिक बँक लवकरच ४० कोटी डॉलर देणार असल्याचं त्यात म्हटलं आहे. सध्याच्या आर्थिक पेचप्रसंगावर मात करण्यासाठी मदत करत राहण्याची ग्वाही जागतिक बँकेनं दिली असल्याचंही यात म्हटलं आहे.

श्रीलंकेकडे परदेशी चलनाचा साठा पुरेसा नसल्यानं इंधन, औषधं आणि अन्नधान्यासह जीवनश्यक गोष्टींच्या आयातीकरता रक्कम चुकती करणं श्रीलंकेला कठीण झालं आहे. त्यासंदर्भात श्रीलंकेनं याआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी बोलणी केली आहेत. मात्र श्रीलंकेसाठी नाणेनिधीचा मदत कार्यक्रम निश्चित होईपर्यंत श्रीलंकेला ३ ते ४ अब्ज डॉलर्सची निकड आहे.

भारतानं १९० कोटी डॉलर्स देऊन श्रीलंकेला मदत केली आहे. श्रीलंकेनं आशियाई विकास बँकेकडेही मदत मागितली आहे. परकीय चलन मिळवण्यासाठी, दीर्घकालीन विजा विकण्याची घोषणाही श्रीलंकेनं आता केली आहे.

Exit mobile version