स्थानिक गरजा आणि उपलब्धता लक्षात घेऊन योजना आखल्या, तर शाश्वत विकास शक्य – प्रधानमंत्री
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक गरजा आणि उपलब्धता लक्षात घेऊन योजना आखल्या, तर शाश्वत विकास शक्य आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आसाममध्ये दिफू इथं शांती एकता आणि विकास मेळाव्यात बोलत होते.
स्थानिक गरजांवर सरकारचा भर आहे, असं त्यांनी सांगितलं. आसाममध्ये यापुढं अराजक आणि विद्वेश दिसणार नाही, आसामच्या मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न राज्यात शांती कायम राखतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिफू इथं पशु वैद्यकीय महाविद्यालय आणि कोलोंगा इथं कृषी महाविद्यालयासह ५०० कोटी रुपयापेक्षा जास्त खर्चाच्या विविध शैक्षणिक प्रकल्पांची पायभरणी प्रधानमंत्र्यांनी केली.