मराठा क्रांती मोर्चाच्या विद्यार्थ्यांचं मंत्रालयात आंदोलन
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : खासदार छत्रपती संभाजी यांच्या उपोषणाला दीड महिना उलटला तरीही त्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता राज्य सरकारनं केली नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या विद्यार्थ्यांनी आज मंत्रालयात आंदोलन केले.
सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या दालनासमोरच विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजि केली. राज्य सरकारने संभाजीराजेंना १४ आश्वासने दिली होती. त्याल एकही आश्वासन पूर्ण केले नाही.
मराठा समाजाच्या चार हजार विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्नही प्रलंबित आहे. सरकारकडून केवळ चालढकल केली जात असल्याचा आरोप करतानाच जोपर्यंत प्रश्न सोडविले जात नाहीत तोवर हटणार नसल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.