Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात कोळसा कंपन्यांकडे पुरेसा कोळसा साठा उपलब्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोळसा कंपन्यांकडे पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. कोल इंडियाकडे ५६ मेट्रिक टनांहून कोळशाचा साठा आहे आणि सिंगरेनी कंपनीकडे ४ मेट्रिक टनापेक्षा जास्त साठा आहे. कॅप्टिव्ह कोल ब्लॉक्समध्ये सुमारे २ मेट्रिक टनापेक्षा अधिक कोळशाचा साठा आहे. औष्णिक ऊर्जा केंद्रांची मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरातील कोळशाच्या मालगाड्यांना प्राधान्य देण्यासाठी सरकारनं अनेक प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधान्य नसलेल्या क्षेत्रांमध्ये आणि कमी व्यस्त मार्गांवर गाड्या रद्द केल्या आहेत. कोल इंडियाचं ​​कोळसा उत्पादन गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या महिन्यात २७ टक्क्यांहून अधिक वाढलं आहे. भारतीय रेल्वे देशभरातील वीज निर्मिती कंपन्यांकडे कोळशाचा साठा हलवण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं कोळसा मंत्रालयानं सांगितलं आहे.

Exit mobile version