चीनची राजधानी बिजिंगमधे प्रशासनाची पुन्हा एकदा कोविड संसर्गाशी झुंज
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त चीनची राजधानी बिजिंग इथं मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन, पुन्हा कोविड संसर्ग वेगाने फैलावल्याच्या पार्श्वभूमीवर बिजिंग प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
राजधानीच्या ११ प्रशासकीय प्रभागांमधे पुढचे तीन दिवस कसून कोविड तपासण्या करण्यात येणार आहेत. २२ एप्रिलपासून बिजिंगमधे कोविडचे सुमारे साडेचारशे नवे रुग्ण मिळाले असून, त्यामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी गर्दी हटली आहे.
शाळा, उपाहारगृहं, मनोरंजन स्थळं बंद आहेत. शांघायमधेही लॉकडाऊन घोषित केला आहे. कोविडच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी तपासणी मोहिमेद्वारे चीनची झुंज सुरु आहे.