ट्विटर व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांसाठी नाममात्र शुल्क आकारू शकते – एलोन मस्क
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटर नेहमी प्रासंगिक वापरकर्त्यांसाठी विनामूल्य असेल परंतु व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांसाठी नाममात्र शुल्क आकारू शकतं, असं सुतोवाच ट्वीटरचे इलॉन मस्क यांनी केलं आहे. ते म्हणाले की ट्वीटरचा त्यांच्या कंपनीत समावेश झाल्यानंतर, नवीन वैशिष्ट्यांसह ट्वीटरची व्याप्ती वाढवायची आहे. तसंच ट्वीटरवरील विश्वास वाढवण्यासाठी नवीन उपाययोजना करायच्या आहेत.
गेल्या महिन्यात, ट्विटरशी करार करण्याआधीच, मस्क यांनी ट्विटर ब्लू प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवेमध्ये काही बदल सुचवले होते, ज्यात त्याची किंमत कमी केली होती.