Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती नवी पाठ्यपुस्तकं असतील – शालेय शिक्षणमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी येत्या १३  जूनला सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती नवी पाठ्यपुस्तकं असतील, यासाठी शिक्षण विभाग नियोजन करत आहे, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट केलं आहे.

विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवी कोरी पुस्तकं मिळण्याचा आनंद देण्याच्या उद्देशानं हे नियोजन सुरु असल्याचं त्या म्हणाल्या. याच उपक्रमाचा भाग म्हणून आज राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या मुंबईतल्या विभागीय भांडारातून नव्या पाठ्यपुस्तकांची पहिली गाडी रवाना झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता १ली ते ८वी च्या विद्यार्थ्यांना यावर्षी ५ कोटी ४० लाखातून अधिक मोफत पाठ्यपुस्तकं वितरित करण्यात येणार आहेत असंही त्या म्हणाल्या.

Exit mobile version