रशियावर संभाव्य अतिरिक्त निर्बंधांबद्दल जी-७ राष्ट्रांच्या अन्य नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल – जो बायडेन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधल्या युद्धामुळे रशियावर संभाव्य अतिरिक्त निर्बंधांबद्दल या आठवड्यात जी-७ राष्ट्रांच्या अन्य नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं आहे. ते न्युयॉर्क इथं प्रसारमाध्यामांशी बोलत होते.
अमेरिका नेहमी अतिरिक्त निर्बंधांसाठी तयार आहे. युरोपियन युनियननं रशियावर टप्प्याटप्प्यानं तेल निर्बंधासह, आतापर्यंतच्या सर्वात कठोर निर्बंधांचा प्रस्ताव दिल्यानंतर अमेरिकेच्या योजनांबद्दल ते बोलत होते.
रशियानं पूर्व युक्रेनमध्ये आपलं आक्रमण तीव्र केलं आहे. दरम्यान, रशियानं पश्चिम युक्रेनमधल्या लक्ष्यांवर हल्लेही वाढवले आहेत, असं युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं काल सांगितलं. पाश्चात्य देशांकडून दिल्या गेलेल्या शस्त्रास्त्र वितरणात रशियन फौजा व्यत्यय आणत आहेत, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.