फ्रान्ससह ३ युरोपीयन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रांसच्या यशस्वी दौऱ्यानंतर आज सकाळी मायदेशी परतले. प्रधानमंत्र्यांचा या वर्षातला हा पहिलाच दौरा होता. सुरवातीला प्रधानमंत्र्यानी जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्या बरोबर द्वीपक्षीय चर्चा केली.
त्यानंतर सहाव्या आंतर-सरकार सल्लागार परिषदेला दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे संबोधीत केलं. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी वार्ताहर परिषदेलाही एकत्रितपणे संबोधित केलं. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल पॅरीसमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉन यांच्याशी संरक्षण, अंतराळ विज्ञान, नील अर्थव्यवस्था, नागरी अण्वस्त्र वापर आणि परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
तसंच प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेचा आढावा त्यांनी घेतला. जागतिक हितासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यात धोरणात्मक भागीदारी करण्याबाबतही या चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यामुळे दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ झाले आहेत. मोदी यांनी फ्रान्सच्या अध्यक्षांना भारत भेटीवर येण्याचं आमंत्रण दिलं असल्याचं या बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त पत्रकाद्वारे सांगण्यात आलं.