Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवर सरकार ठाम – छगन भुजबळ

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवर सरकार ठाम असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं. मंडल कमिशन ते खानविलकर समिती पर्यंत कोणीही OBC आरक्षण नाकारलं नसून त्यांनी सुचवलेली ट्रिपल टेस्टची प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम सुरु असल्याचं ते म्हणाले.

मध्यप्रदेश मध्ये १५ दिवसात डाटा गोळा केला. त्यांची मदत आणि माहिती घेऊन त्याप्रमाणे कोर्टात टिकेल अशा रीतीनं काम पूर्ण करण्याचा सरकारचा  प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपचे पदाधिकारी न्यायालयात जाऊन ओबीसी आरक्षणाला आडकाठी आणत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केली.

एकीकडे विरोधी पक्ष म्हणून OBC आरक्षणासाठी पाठींबा द्यायचा आणि दुसरीकडे त्याविरोधात याचिका करायची यामुळे राज्याचंच नव्हे, तर संपूर्ण देशाचं नुकसान होत आहे. त्यामुळे अशा पक्ष सदस्यांना आवरावं अशी विनंती आपण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं भुजबळ म्हणाले.

Exit mobile version