इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशनचं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे डी विभागातल्या केशवराव खाड्ये मार्गावर अन्न कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पापासून इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशनचं उद्घाटन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. वाया गेलेल्या खाद्य पदार्थांपासून निर्मित वीजेचा उपयोग करुन इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करणारे भारतातलं हे पहिलंच केंद्र आहे. अशा स्वरुपाचं केंद्र मुंबईतच नव्हे तर राज्यातल्या शक्य त्या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न केले जात आहेत, असं ठाकरे यावेळी म्हणाले. या चार्जींग स्थानकांचा महामार्गावर जास्त उपयोग होईल. त्यातून विद्युत वाहनांच्या वापराला चालना तर मिळेलच, सोबत सेंद्रिय, जैविक स्वरुपाच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन देखील होईल, त्यामुळे महामार्गांवर जास्तीत जास्त ठिकाणी हे चार्जींग स्थानकं उभारण्याच्या सुचना त्यांनी केल्या.