देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ६७ लाखाच्या वर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ६७ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८७ कोटी ११ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना दोन, तर २ कोटी ८७ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना १० कोटी २३ लाखापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना ४ कोटी १८ लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून १० लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून ५३ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६ कोटी ५७ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी २८ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा, तर २४ लाख ८० हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना सुमारे ६६ लाख , तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना ३० लाख ३४ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.