भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे आयुर्वेद आहाराअंतर्गंत येणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी नवे नियम
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष मंत्रालय, भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं आयुर्वेद आहाराअंतर्गंत येणाऱ्या खाद्यपदार्थांची सुरक्षा आणि गुणवत्तेचे नवे नियम तयार केले आहेत. या नव्या नियमांच्या आधारे उत्पादकांना गुणवत्तायुक्त आयुर्वेदिक खाद्यपदार्थ तयार करावे लागणार आहेत.
हे गुणवत्तापूर्ण आयुर्वेदिक खाद्यपदार्थांची विक्री ‘मेक इन इंडिया’अंतर्गत जागतिक पातळीवर करण्यासाठी मदत केली जाईल. त्यामुळे आता खाद्य सुरक्षा आणि मानक आयुर्वेद आहार नियम २०२२ या नव्या नियमानुसारच आयुर्वेदिक खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि विक्री करणं बंधनकारक असेल.