राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल ठरला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशात माउ, इथं भारतीय बीज अनुसंधान संस्थेत झालेल्या ३७ व्या वार्षिक बिजोत्पादन आढावा बैठकीत देशातल्या ६५ प्रकल्पांमधे विद्यापीठाला हा सन्मान मिळाला. या बिजोत्पादन प्रकल्पाद्वारे तयार होणारं फुले बियाणं हे महाराष्ट्रातल्याच नव्हे तर शेजारच्या राज्यातले शेतकरी आणि बिजोत्पादन कंपन्यांच्या पसंतीस उतरलं आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या कांदा फुले समर्थ बियाण्याला तसंच सोयाबीन पिकाचं फुले संगम आणि फुले किमया या वाणांच्या बियाण्याला शेतकऱ्यांची पहिली पसंती असते.