मान्सून परवा अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं असनी चक्रीवादळ शमलं आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सूनची वाट सुकर झाली आहे. दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरावर १५ मे रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे. दरवर्षी मान्सून अंदमानात १८ ते २० मेच्या दरम्यान दाखल होत असतो. मात्र अनुकूल स्थितीमुळे तो पाच दिवस अगोदर येण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये असलेली उष्णतेची लाट पुढचे दोन तीन दिवस कायम राहील. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.