Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महावितरणच्या नावे बनावट मॅसेज

मुंबई (वृत्तसंस्था) : महावितरणच्या नावे बनावट मॅसेज येत असून, त्या मॅसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, असं आवाहन महावितरणच्या औरंगाबाद कार्यालयानं केलं आहे. आपल्या वीजबिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने आज रात्री साडे नऊ वाजता आपला वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, अशा आशयाचा बनावट मॅसेज वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठवण्यात येत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर महावितरणनं एक पत्रक जारी करुन नागरिकांना आवाहन केलं आहे. बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून एखादी लिंक पाठवण्यात आली असेल तर त्याला देखील दुर्लक्ष करावं, असं सांगण्यात आलं आहे.

Exit mobile version