Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असून नागरिकांना दिलासा देऊन त्यांचे जीवन सुलभ करेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अर्थमंत्र्यांनी या निर्णयाबाबत केलेल्या ट्वीटचा उल्लेख करून प्रधानमंत्री म्हणाले की आमच्यासाठी नेहमीच जनता सर्वप्रथम आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या गॅस सिलिंडर मागे २०० रुपयांची कपात केल्यामुळे कुटंबाचा आर्थिक भार कमी व्हायला मोठ्या प्रमाणात मदत मिळेल.

आव्हानात्मक जागतिक परिस्थितीत केंद्र सरकारनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. अन्य क्षेत्रांसाठी देखील केंद्र सरकारनं मोठे निर्णय घेतल्यामुळे वस्तुंच्या किमती देखील कमी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपाची सत्ता नसलेल्या अन्य राज्यांनी देखील करात कपात करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे उज्ज्वला योजनेच्या ९ कोटी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल, असंही ते म्हणाले. अखिल भारतीय व्यापार संघटनेनंही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Exit mobile version