Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दाओसमध्ये विविध कंपन्यांसोबत राज्याचे ३० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वित्झर्लंडमधे दावोस इथं आयोजित जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशांमधल्या २३ कंपन्यांनी काल राज्याशी एकूण ३० हजार ३७९ कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. याद्वारे राज्यात सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.

या गुंतवणूक करारांमध्ये ५५ टक्क्यापेक्षा जास्त अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांमधली आहे. यामध्ये प्रामुख्यानं औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प आणि अन्न प्रक्रिया, पोलाद, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक इ. क्षेत्रांचा समावेश आहे.

Exit mobile version