Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करण्याचे महिला व बाल विकासमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे निर्देश

मुंबई : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात येते. या अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय.ए.कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रूबल अग्रवाल, मौनी विद्यापीठाचे प्रताप देसाई, मधुकर देसाई, मिलिंद पांगिरेकर आदि उपस्थित होते.

मंत्री ॲड.  ठाकूर म्हणाल्या, अंगणवाडी सेविकांना कामात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी  जिल्हास्तरावर वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येते. राज्यात तीस अंगणवाडी सेविका प्रशिक्षण केंद्र व पाच मध्यम स्तर पर्यवेक्षिका केंद्र आहेत. या केंद्रामार्फत अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात येते. कोरोना कालावधीत आपल्याला अंगणवाड्या बंद ठेवाव्या लागल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी बालकांना घरपोच आहार दिला. कोविड योद्धा म्हणून त्यांनी बजावलेली जबाबदारी अमूल्य आहे.

Exit mobile version