Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चेन्नईमध्ये २८ हजार ५४० कोटी रुपयांच्या सहा महत्त्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हैद्राबाद आणि चेन्नईच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेच्या दीक्षांत समारंभाला प्रधानमंत्री उपस्थिती राहणार आहेत. तसंच उपस्थितांना संबोधित करणार आहेत. आय.एस.बी.चं उद्घाटन २ डिसेंबर २००१ रोजी माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झालं होते. देशातल्या आघाडीच्या शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेसनं प्रशिक्षण आणि कौशल्यवृद्धीसाठी अनेक मंत्रालयांनाही सहकार्य केलं आहे. देशातील पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याच्या दिशेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी चेन्नईमध्ये २८ हजार ५४० कोटी रुपयांच्या सहा महत्त्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. तसंच ते २ हजार ९६० कोटी रुपयांचे पाच पूर्ण झालेले प्रकल्प देशाला समर्पित करतील. या सर्व ११ प्रकल्पांची एकूण किंमत ३१ हजार ५०० कोटी रुपये इतकी आहे. पूर्ण झालेल्या प्रकल्पांमधे तंबारमवरुन चेंगलपट्टूला जोडणाऱ्या तिसरी ब्रॉडगेज लाईन तर ५०० कोटी रुपये खर्च करुन ७५ किलोमीटर लांब मदुराईवरुन थेनीला जोडणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचा देखील यात समाविष्ट आहे. त्यानंतर प्रधानमंत्री मोदी ११६ कोटी रुपये खर्च करुन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चेन्नईमधे बांधण्यात आलेल्या १ हजार १५२ घरांच्या किल्ल्या लाभार्थ्यांना देतील.

Exit mobile version