Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातल्या पाटबंधारे प्रकल्पांमधे सुमारे ३७ टक्के जलसाठा शिल्लक

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमधे २५ मे अखेर ३६ पूर्णांक ६८ टक्के जलसाठा शिल्लक असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. राज्यातल्या टंचाईग्रस्त भागात ४०१ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.राज्यातल्या उपलब्ध जलसाठ्यातून नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठा व्हावा, यासाठी शासन जलसाठयाचं नियोजन करत आहे. यासाठी वेळोवळी जलसाठ्याचा आढावा घेऊन नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात टँकरग्रस्त गावांमध्ये ५३ नं, तर वाड्यांमध्ये ११६ नं वाढ झालेली आहे. तसंच टँकर्समध्ये ४६ नं वाढ झालेली आहे. राज्यात पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण ४०१ टँकर्समध्ये ८९ शासकीय आणि ३१२ खाजगी टँकर्सचा समावेश आहे.

Exit mobile version