Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आठ वर्षांच्या काळात केंद्र सरकारनं आरोग्य सेवा देशाच्या तळागळात पोहचवली – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातमध्ये राजकोट जवळील अटकोट इथं नव्यानं बांधलेल्या मातुश्री के.डी.पी. बहुउद्देशीय रुग्णालायचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. २०० खाटांच्या नव्या रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय उपकरणं आणि उच्चं दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातल्या आरोग्य सुविधांची पहाणी केली. आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून रुग्णांच्या गंभीर आजारांचा खर्च सरकार उचलत असून देशात जवळपास ५० कोटी लोकांना आयुष्यमान कार्डाचं वाटप करण्यात आलं असल्याचं प्रधानमंत्री उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना म्हणाले. आठ वर्षांच्या काळात सरकारनं आरोग्य सेवा देशाच्या तळागळात पोहचवली आहे. देशात उभारण्यात आलेल्या जनऔषधी केंद्राचा वापर लाखो लोक करत असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना महामारीच्या काळात सर्वांना लस उपलब्ध करून दिली असल्याचंही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला, डॉ.महेंद्र मुंजपारा तसंच इतर मंत्री उपस्थित होते. यांनतर प्रधानमंत्री गांधीनगर मधल्या महात्मा मंदिरमध्ये होणाऱ्या सहकार संमेलनाला संबोधित करणार आहेत. यादरम्यान ते कलोल इथल्या इफकोच्या नव्यानं बांधलेल्या नॅनो लिक्विड युरिया प्रकल्पाचं उद्घाटन करतील.

Exit mobile version