Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणाऱ्यांचं देश स्मरण करत आहे – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणाऱ्यांचं देश स्मरण करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नमो ऍप वर लिहिलेल्या एका लेखात म्हटलं आहे. नमो ऍपमधल्या विकास यात्रा या भागात देशाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या महान व्यक्तींवर लिहिलेल्या लेखात त्यांनी ही माहिती दिली. यंदाच्या वर्षी देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असून, ही वेळ स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्याची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

देशाच्या वैभवशाली संस्कृतीचा सर्वांना अभिमान असून आपल्या सरकारला त्याच्या जतनासाठी काम करण्याची आणि त्याचा सोहळा साजरा करण्याची संधी मिळाली असं आपण नम्रपणे नमूद करत असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे. भारत ही वैभवशाली समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेली भूमी असून केंद्रसरकार त्याचं जतन करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version