Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एकमेकांच्या सहकार्यानं जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करणं हा क्वाड देशांचा उद्देश – एस. जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल्यानुसार, एकमेकांच्या सहकार्यानं जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करणं हा क्वाड देशांचा उद्देश असल्याचं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नमूद केलं.

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा गट काम करत राहील आणि त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न होऊ नये असंही त्यांनी नमूद केलं. व्हाईस ऍडमिरल के. के. नय्यर स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. क्वाड गट हा लवचिक आणि समजून घेऊन काम करणारा असल्यानं अचूकपणे काम करतो आणि शीतयुद्धाच्या काळातल्या ताठरपणापेक्षा ते वेगळं असल्याचं ते म्हणाले.

भारत-प्रशांत विभाग हा भूतकाळ नसून ते भविष्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.दरम्यान, जयशंकर आज स्लोव्हाकिया आणि झेक प्रजासत्ताकच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यात ते स्लोव्हाकियाचे पंतप्रधान एड्युआर्ट हेगर यांची भेट घेणार आहेत, तसंच स्लोव्हाकियाचे परराष्ट्रमंत्री इव्हान कोरकॉक यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. झेक प्रजासत्ताकच्या दौऱ्यात ते त्या देशाचे परराष्ट्रमंत्री जान लिपावस्की यांनी यांच्याशी चर्चा करणार आहेत.

Exit mobile version