आगामी आंतरराष्ट्रीय योग दिवस-२०२२ निमित्त बीजिंगमधील भारतीय दूतावासांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी आंतरराष्ट्रीय योग दिवस-२०२२ निमित्त बीजिंगमधील भारतीय दूतावासानं विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. याचा भाग म्हणून चीनमधले योग प्रशिक्षक मोहन भंडारी यांनी दूतावासामधल्या सांस्कृतीक केंद्रात प्राणायामचा वर्ग घेतला.
चीनमध्ये योग आणि त्याच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याचा आपला अनुभव त्यांनी सांगितला. दोन्ही देशांच्या नागरिकांना एकमेकांना अधिक जाणून घेण्यासाठी योग उपयोगी ठरतो असं ते म्हणाले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं स्मरण म्हणून बीजिंगमधल्या भारतीय दूतावासानं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमासाठी चीन मधल्या योग प्रशिक्षण देणाऱ्या ७५ संस्थांना एकत्र आणलं आहे.