Site icon साप्ताहिक एकच ध्येय

उत्तर प्रदेशात १ हजार ४०६ विकास प्रकल्पांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजीटल क्रांतीमुळेच भारत ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था बनला असून या क्षेत्रात गगनाला गवसणी घालण्याची क्षमता भारतात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज उत्तर प्रदेशात लखनऊ इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करताना बोलत होते.

उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात मोदी ८० हजार कोटी रुपये खर्चाच्या १ हजार ४०६ विकास प्रकल्पांचा प्रारंभ करणार आहेत. दूरसंवाद आणि दूरसंचार क्षेत्रात प्रगती साधल्यामुळेच भारत विदा संकलनाचं महत्त्वाचं केंद्र बनला आहे, असं ते म्हणाले. आतापर्यंत देशात ८४ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक आल्याची माहिती त्यांनी दिली.

Exit mobile version