सर्व नागरिकांना शाश्वत विकासाला चालना देण्याचे आवाहन – राष्ट्रपती
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सर्व नागरिकांना शाश्वत विकासाला चालना देण्याचं आवाहन केलं आहे. हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करुन आगामी पिढ्यांसाठी पृथ्वीचं संरक्षण करण्याच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी लोकांना निसर्गाशी पुन्हा जोडून घेण्याचं आणि त्यामुळे होणारं नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. पर्यावरण दिनाची या वर्षीची संकल्पना ‘ओन्ली वन अर्थ’ लोकांना आठवण करून देते की पृथ्वी हा ग्रह आपलं एकमेव घर आहे. त्यामुळं आपण सध्याच्या आणि भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी निसर्गाशी एकरूप होऊन जगलं पाहिजे असं उपराष्ट्रपतींनी सांगितलं.