युजरआयडीबरोबर आधारकार्ड जोडलेल्या व्यक्तींना एका महिन्यात २४ वेळा तिकिट बुक करता येणार -रेल्वे मंत्रालय
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं आयआरसीटीसी संकेतस्थळ आणि अॅपवरुन तिकीट बुकींग करण्याचं प्रमाण वाढवलं आहे. एखाद्या व्यक्तीचा युजर आयडी आधारशी सलग्न नाही, अशा व्यक्तीला एका महिन्यात सहावरुन बारा वेळा तिकिट बुक करता येणार आहे, असं रेल्वेमंत्रालयानं सांगितलं आहे. तसंच ज्यांचं आधारकार्ड युजरआयडीबरोबर जोडलेलं आहे, अशा व्यक्तीला बारावरुन चोवीस तिकिटं एका महिन्यात काढता येतील.