Site icon साप्ताहिक एकच ध्येय

निवृत्त कर्मचाऱ्यांचे, ५०० रुपयांपर्यंतचे मेडिक्लेम कुठल्याही पडताळणीशिवाय द्यायचा केंद्रसरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्त कर्मचाऱ्यांचे, ५०० रुपयांपर्यंतचे मेडिक्लेम कुठल्याही पडताळणीशिवाय द्यायचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला असल्याचं, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं आहे. माडंविय यांनी काल पाटण्यात अतिरिक्त संचालकांच्या नवीन कार्यालयाचं उद्धाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. अधिकाऱ्यांना जिल्हा आणि मंडळ स्तरावर पंचायती घेऊन सीजीएचएस अर्थात केंद्रीय सरकार आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांचं प्रश्नांचं निराकरण करण्याचे निर्देश दिले असल्याचं मांडविय यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात आरोग्य सेवा सहज उपलब्ध तसंच सामान्य लोकांना परवडणारी झाली असल्याचं, ते यावेळी म्हणाले.

Exit mobile version