अरीगनार अन्ना प्राणीसंग्रहालयाकडून प्लॉस्टिक बॉटल्सच्या वापरावर प्रत्येकी १० रुपये आकारणी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नईच्या अरीगनार अन्ना प्राणीसंग्रहालयानं प्लॉस्टिक बॉटल्सचा कचऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्राणीसंग्रहालयात एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. कालच्या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून प्राणीसंग्रहालयानं येणाऱ्या लोकांकडून प्लॉस्टिक बॉटल्सच्या वापरावर प्रत्येकी १० रुपये आकारणी करायला सुरूवात केली आहे. ही प्लॉस्टिक बॉटल प्राणीसंग्रहालयात परत केल्यावर त्यांना आकारलेले दहा रुपये परत दिले जाताात. या उपक्रमाचा चांगला फायदा होत असल्याचं प्राणीसंग्रहालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.