Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जपान आणि नाटो अधिकाऱ्यांनी लष्करी सहकार्य आणि संयुक्त सराव वाढवण्यास सहमती दर्शवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपान आणि नाटो (NATO) अधिकाऱ्यांनी लष्करी सहकार्य आणि संयुक्त सराव वाढवण्यास सहमती दर्शवली आहे.  युरोपीय देशांसोबतचे संबंध मजबूत करण्याची जपानल आशा असून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नाटोच्या विस्तारित सहभागाचं जपान  स्वागत करतो, असं जपानचे संरक्षण मंत्री नोबुओ किशी यांनी एका निवेदनात काल  म्हटलं आहे.

युरोप आणि आशियाची सुरक्षा एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे, विशेषत: आता आंतरराष्ट्रीय समुदायासमोर गंभीर आव्हानं आहेत. नाटो मिलिटरी कमिटीचे प्रमुख रॉब बाऊर टोकियोला भेट देत असून भूमध्य समुद्रात जपानचे सागरी सेल्फ-डिफेन्स फोर्स नाटो नौदल सरावात सहभागी होत आहेत.

काल जपानच्या मंत्रिमंडळानं  वार्षिक धोरण आराखड्यालाही मंजुरी दिली. ज्यामध्ये संरक्षण क्षमता आणि पाच वर्षांच्या आत खर्चाचं कठोर बळकटीकरण करणं आवश्यक आहे.

या योजनेत प्री-एम्प्टिव्ह स्ट्राइक क्षमता तसंच स्पेस, सायबर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक संरक्षण, मानवरहित शस्त्रे विकसित करणं आणि बळकट करणं हे जपानच्या धोरणातला एक मोठा बदल आहे.

Exit mobile version