देशभरात आठ वर्षात ६६ विमानतळ उभारले गेले- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला आहे. त्याचबरोबर या आठ वर्षांत अनेक योजनांच्या माध्यमातून गोरगरीबांच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त केला, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं आहे. ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याच्या केंद्रसरकारच्या धोरणामुळे देशभरात आठ वर्षात ६६ विमानतळ उभारले गेले, असंही ते म्हणाले.