स्वच्छ भारत ही तंदुरुस्त आणि शक्तिशाली भारताची गुरुकिल्ली – अनुराग सिंह ठाकूर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : “स्वच्छ भारत” ही तंदुरुस्त आणि शक्तिशाली भारताची गुरुकिल्ली आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज सांगितलं. त्यांनी आज सकाळी लखनौ इथल्या हजरतगंज इथं ‘फिट इंडिया, स्वच्छ भारत’ रॅलीला हिरवा झेंडा दाखवला,त्यावेळी ते बोलत होते. लखनौ इथल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या खेळाडूंना आणि नेहरू युवा केंद्राच्या सदस्यांना संबोधित करताना ठाकूर म्हणाले की,संपूर्ण देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यावेळी आपण भारतात खेळ आणि तंदुरुस्तीची संस्कृती विकसित केली पाहिजे. खेळाडूंना सर्व सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असंही अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. नंतर ते केडी सिंग बाबू स्टेडियम लखनऊ इथं NYK आणि SAI च्या कार्यक्रमात सहभागी झाले. एनडीए सरकारनं सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे देशात बरेच बदल झाले असून लोकांची मानसिकता बदलली आहे, असं स्वच्छतेच्या गरजेवर भर देताना अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितलं.